शनिवार, १३ डिसेंबर, २००८

ज़िंदगी, मेरे घर आना..

Six Flags...! मुंबईमध्ये असताना, Essel World पण पाहिलं नसताना तशा जत्रेचं आक्राळविक़ाळ रुप पहिल्यांदा पाहून हरखून गेलो. सकाळी लवकर जऊन मोठ्या Roller Coster साठी रांग लावायची. जसजसा नंबर जवळ आला तसं वाढत जाणारं कुतुहल, नुकतीच ride घेवून झालेल्या लोकांच्या चेह-यावरचे भाव पाहू लागलो.

बस्स...अखेरीस ride. श्वास थांबून रहावा एवढा वेग, uncertainity वेगळेपणा! किंचाळणारे लोक. फक्त राक्षसी roller coster सर करण्याची कैफ चढली. थोड्या वेळानंतर आनंद (किंवा excitement) केवळ उंची, वेग आणि थरार यांत मांडू लागलो.

पण थांब! एरव्ही जसं मी करतो, तसं Hi मी शेजारी बसलेल्या व्यक्तीला केलं नाही. अरे, मला ठाऊकसुध्दा नव्हतं कि मझ्या शेजारी कोण होता/होती ते. फक्त काही सेकंदाच्या त्या अनुभवानंतर पुन्हा दुसरीकडे धावण्याच्या नादात मी आनंद अनुभवला नाही. एवढ्या भन्नाट वेगात असताना आपण खरंच सुख अनुभवतोय का, अशी कुरकुर मनाला होती. तितक्यात, समोर एक merry-go-round दिसला. ८-१० वर्षांची पोरं आणि म्हातारी-कोतारी माणसं बसलेली पाहून वाटलं की थोडा change म्हणून बसावं.

दोन इवल्याश्या डोळ्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं. merry-go-round सुरु होण्याअगोदर, बक्कल कसं लावायचं हे माहित नसल्यामुळे कावरी-बावरी झाली होती. मी पुढे सरसावून मद्त केल्यावर ते अबोल कृतज्ञतेचे भाव मनाला स्पर्शून गेले. तो लहान मुलांचा आनंद आणि म्हाता-या लोकांचं 'दूधाचं ताकावर भागवून' घेतल्याचं समाधान पाहून प्रसन्न वाटलं. मुलं आपल्या लाकडी घोड्याला शाबासकीची थाप देताना पाहून, तसं करण्याचा मोह मला अनावर झाला.

जर आनंद हा केवळ वेग आणि उंचीवर नक्की नाही. तरीही आपण तसा हट्ट करतो. बाहेरगावी असताना जास्त काम करण्याची धडपड, आणि offshore ला पगारासाठी करणार ती किती? आज जरा थांबावसं वाटतंय. चिखलातल्या डुक्करासारखं अंथरुणामध्ये पडून न राहता काहितरी लिहावसं वाटतंय. थोडं हसावसं - थोडं रडावसं वाटतंय. काही अक्षरं सुचली म्हणून लिहितोय. काही वेळाने पुन्हा त्याच वेगात गुरफटेन.
पण हे पण तेवढंच खरं, की नंतर कधीतरी जेव्हा स्वत: हा लेख वाचेन, तेव्हा मी जीवनाच्या अर्थापासून केवळ हातभर लांब होतो हे नक्की जाणवेल.

सोमवार, २९ सप्टेंबर, २००८

मैत्रीची आठवण

मैत्रीची आठवण मनात प्रेमाची ऊब करून जाते,
एक गुलाबाचे फुल पुस्तकावर छाप ठेवून जाते,
नास्तिकाच्या मनात आस्तिकतेची भावना ठेवून जाते,
अन जडावलेल्या लेखणीमधून एक चारोळी झरून जाते.
...साबाजी