रविवार, २४ जानेवारी, २०१०

शोध आठवणींचा

Youtube हे एक भन्नाट tool आहे. "ईछा तेथे youtube", अस म्हटल तरी ही अतिशयोक्ती ठरू नये. Onsite ला असताना weekends ला सर्वसाधारणपणे हाच timepass असतो. कधी नवीन गाणी, तर कधी जुने चित्रपट सहजासहजी सापडत - आणि तेही नकळत. कधी कधी आपण शोधतो एक आणि सापडत काहीतरी दुसरच!

असाच एक weekend मी घरी पडिक असताना, कोणास ठाऊक, जुन्या TV commercials पाहु लागलो. एकानंतर दुसरी नंतर तिसरी असा क्रम चालू झाला. मग बजाजची जुनी advertise दिसली ती ही,



मला अचानक दिवाळीची आठवण झाली. पुन्हा ती commercial पहिली आणि सारखी पाहत राहिलो. यामध्ये दिवाळीसाठी खास काही नव्हत, पण मला दिवाळीचे दिवस का आठवतात हे उमगल नाही. मी पण चंग बांधला. Photo album सारख्या आठवणी उलट्या चाळू लागलो. अगोदरची दिवाळी - मग त्या अगोदरची - नंतर त्या अगोदरची... पोटात आग लागली म्हणून kitchen मध्ये जाऊन fridge उघडला, आणि आठवल - नव्हे दिवाळीचा तो दिवस एका flashback सारखा समोर उभा राहिला.

खूप लहान होतो आम्ही. दिवाळी म्हटली की चाळीत एक चैतन्य सळसाळायच. तोरण, नवीन कपडे, lighting असायची आणि या गोष्टी केवळ सणासुदीला मिळायाच्या. अश्या एका दिवाळीपूर्वीच्या संध्याकाळी मी कंदील बनवत होतो. चाळीत कंदील विकले गेले तरी बर्‍यापैकी पैसे मिळायचे आणि छंद पण जोपासला जायचा. दंडीवर कपड्यांच्या ऐवजी १०-१२ कंदील - स्वतःसाठी pant केव्हा मिळणार, म्हणून (शेपटिसाठी) चूपचाप वाट पाहत असायचे.

"नाईकांच घर हेच का?" एक माणूस दारात आला. काही माणस‌ मागे मोठा box घेऊन उभे! आई बाहेर येऊन म्हणाली "हो, का - काय झाल?". "फ्रीज आहे तुमच्या नावाने.." "नाही. पत्ता चुकीचा असेल कदाचित. महाराष्ट्र निवास मध्येपण एक नाईक राहतात." आई म्हणाली. "नाही. इक़बाल मंझील आहे. खोली नंबर ७!" "हो.. पण कोणी मस्करी केली असेल. तुम्ही परत घेऊन जा हा फ्रीज. पुन्हा विचारून बघा मलकांना." तो माणूस पण confuse झाला आणि मागे वळला.

पप्पा तेवढ्यात मागून आले आणि म्हणाले, "मी मागवला आहे तो.. दिवाळीला या वर्षी bonus जास्त मिळाला." एका फ्रीजमुळे घरात चैतन्य आल. कंदिलांच काम बाजूला टाकून आम्ही फ्रीजकडे धावलो. Kelvinator चा तो फ्रीज होता. एक झबरदस्त surprise!
फ्रिजच्या नट्यापट्यामध्ये आम्ही गुंतलो. त्याच काळ्या रंगच handle, आकाशी रांग आणि शुभ्र interior. त्यावरचा पेंग्विन मला खूप छान वाटला. जेवणाची वेळ केव्हा झाली ते कळालंदेखील नाही. आम्ही नंतर TV चालू केला, आणि त्यानंतर लागलेली ad म्हणजे बजाजची!

एका ३० सेकंदांच्या commercial च impression एवढ होईल, अस मला वाटल देखील नव्हत. आठवणींच्या या नयनरम्य प्रवासाचा सुंदर अनुभव मला आपसूक अनुभवायला मिळाला. काही का होईना, पण मी खूप तास याच प्रवासात हरवून गेलो.

आता पण तो फ्रीज तसाच आहे, फक्त रंग बदलला आहे. पण त्याच handle आणि पेंग्विन तस्साच आहे. आणि हो! आतून तो आणि माझ्या आठवणी अजूनही तश्याच्या तश्या आहेत - शुभ्र!