रविवार, २६ डिसेंबर, २०१०

इतकेच मला New York ला येताना कळले होते,
Onsite ने केली सुटका Offshore ने छळले होते.

ही दुनिया चमच्यांची कधीही बदलणार नाही,
त्यांना बदलाया गेलो, ते रंग बदलले होते..

critical deliverables चे credit चला विसरुया
appreciation कधी वेळेवर भेटले होते?

माझ्या appraisal ची कहाणी तीच होती
submit करण्या अगोदर rating ठरले होते

याचेच रडू आले, ना जमली चमचेगिरी
सारे चमचे आता, तुपात उतरले होते.

माझ्या efficiency ची तोंडीच बडबड झाली
credit माझ्या कामाचे ते गिळून बैसले होते

appraisal rating ची पोकळ meeting झाली
कधी नव्हे ते manager ने कान टवकारले होते

मी एकटाच onsite ला deliverables साठी खपलो,
मी India ला येताना client emotional होते.

----------------------------------------------------------

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते