मंगळवार, १२ जून, २०१२

नाते अजब प्रेमाचे

क्षितिजावर झाली भेट चंद्राची सूर्याची,
साक्ष झाली होती त्याला उधाण समुद्राची |
चंद्र म्हणे ही भेट ओझरती का व्हावी,
का आपण सवे बसून गुजगोष्ट करावी |
असे का तुला राग सूर्य ग्रहणाचा,
किंवा असेल गर्व तुझ्या तेजोमायातेचा |
म्हणे सूर्य हसून - खूळ तुज का लागले,
का असावी तुष्टता अथवा दर्प मनी भले |
असे न का उद्गम तुझ्या प्रकाशाचा मज ठायी,
नसे सये किंतु तुझा आड येण्यापायी |
ग्रहण हे असे माझे असणे तुजला देणे,
आपले मिलन हे अंधारातून समक्ष होणे |
असे जरी आपली भेट क्षणभर वा क्षणिक,
प्रेमाचे हे अजब नाते आहे माझ्या हृदयासामीप |