नाते अजब प्रेमाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाते अजब प्रेमाचे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ जून, २०१२

नाते अजब प्रेमाचे

क्षितिजावर झाली भेट चंद्राची सूर्याची,
साक्ष झाली होती त्याला उधाण समुद्राची |
चंद्र म्हणे ही भेट ओझरती का व्हावी,
का आपण सवे बसून गुजगोष्ट करावी |
असे का तुला राग सूर्य ग्रहणाचा,
किंवा असेल गर्व तुझ्या तेजोमायातेचा |
म्हणे सूर्य हसून - खूळ तुज का लागले,
का असावी तुष्टता अथवा दर्प मनी भले |
असे न का उद्गम तुझ्या प्रकाशाचा मज ठायी,
नसे सये किंतु तुझा आड येण्यापायी |
ग्रहण हे असे माझे असणे तुजला देणे,
आपले मिलन हे अंधारातून समक्ष होणे |
असे जरी आपली भेट क्षणभर वा क्षणिक,
प्रेमाचे हे अजब नाते आहे माझ्या हृदयासामीप |